आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी
Shri Madhukar Walhekar
Founder of Vividh shetkari Producer Company Limited
आम्ही विविध शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्र्या मागासलेल्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेती व शेतीपूरक उद्योगांना चालना देणे, बिज भांडवल पुरविणे जैविक व सेंद्रिय खतांचा पुरवठा करणे , शेतकऱ्यांचा उत्पादित माल ऑनलाईन पद्धतीने थेट ग्राहकांना विकणे , शेतकऱ्यांना रास्त भाव मिळवून देणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व गट पद्धतीने २१ समूह शेतकरी शेती धोरण राबविण्याचा आमचा मानस आहे .
सेंद्रिय व जैविक शेती म्हणजे जिवंत पर्यावरण रचना व जीवन चक्रास समजावून घेऊन रासायनिक वापर टाळून एकात्मिक शेती पद्धती होय. सेंद्रिय कृषी उत्पादकासाठी प्रामाणिक प्रक्रिया उत्पादकांशी थेट संबंध असलेल्या बी बियानाचे पुरवठादार , शेतकरी अन्न प्रक्रियादार , त्यामध्ये पिकवणे , साठविणे, प्रक्रिया करणे, पॅकिंग करणे इत्यादी बाबतींचा उत्पादक मानकांचा समावेश असतो . हवा , पाणी, धान्याची रोपे , पशु, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे, अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचविण्यास मदत, आर्थिक उत्पादनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा उपयोग केला जातो.
कर्ज बाजारी व दारिद्र्याच्या विळख्यात अडकलेल्या कष्टकरी गरीब शेतकरी वर्गाला यातून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा .
आनंदाने जगा , आनंदाने जगवा. आम्ही तुम्ही आणि आपण सर्वानीच,
आपली माती आपली नाती या वचनपूर्तीसाठी मात्र आपले सहकार्य अपेक्षित .